आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy From God Shiv Poster In Vadodara On Mahashivratri

बडोद्यामध्ये \'शिवजी की लाचारी\' नावाच्या पोस्टरने उडवली खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात) - नुकताच महाशिवरात्रीचा सण पार पडला. संपूर्ण जगभरात आद्य देवता महादेवाची पुजा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र या महाशिवरात्रीच्याच दिवशी गुजरात मधील बडोद्यामध्ये एका पोस्टरने खळबळ उडवली. शहरातील रावपुरा रोडवर ठिकठिकाणी "शिवजी की लाचारी" नावाने पोस्टर चिटकवण्यात आले होते. खरं तर वडोदरा येथील सुरसागर तलावाच्या मध्यभागी भगवान शंकराची एक विशाल मूर्ती स्थापीत आहे, मात्र या मूर्तीची अनेक वर्षांपासून डागडूजी न झाल्याने ती दुरावस्थेतच आहे. याच गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

सुरसागर तलावात दरवर्षी शिवरात्रीच्या दिवशी महाआरतीचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने भावीक उपस्थित असतात. संध्याकाळी होणाऱ्य या महाआरतीमध्ये गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलही उपस्थित होत्या. तर दुसरीकडे या महाआरतीपूर्वी शहरातील या पोस्टर्सची सर्वत्र चर्चा सुरू होती. हे पोस्टर्स रावपूरा रोडवरील एका अनेक ठिकाणी चिटकवण्यात आले होते.

काय लिहिले आहे पोस्टरवर...
माझ्या प्रिय वडोदरावासीयांनो, तुम्ही पुन्हा एकदा माझा उत्सव शिवरात्री साजरा करण्यासाठी तयार झाला आहात. वदोडराचे नागरिक आणि धर्मरक्षक आनंदाने हुरळून गेले आहेत. मात्र मला या गोष्टीचे खुपच दुःख वाटते की, माझी मुर्ती एवढी कमकुवत झाली आहे आणि त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. आज तुम्ही माझी पुजा करणार, आरती करणार आणि आपापल्या घरी परतणार. मला याच अवस्थेत सोडून तुम्ही मला विसरून जाल.

त्यामुळे माझी वडोदराकरांना ही विनंती आहे की, या आरतीनंतर सर्वजण एकत्र येऊन माझ्या या दयनीय अवस्थेवर विचार करा. केवळ विचारच नाही तर त्याची अंमलबजावणीही करा. जर माझे तुम्ही खरे भक्त असाल तर, या पोस्टरच्या १० कॉपी काढून इतर ठिकाणी त्या चिकटवा.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, कुठे चिकटवण्यात आले हे पोस्टर्स..