आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलाला अघोरी शिक्षा, प्रेयसीला घोडी बनवून प्रियकराची काढली वरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: तरुणीला घोडी बनवून तिच्यावर तरुणाला बसवण्यात आले तशीच दोघांची वरात काढली.)
छोटा उदयपूर (गुजरात)- तेजगडमधील देवलिया या गावातील चौथीपर्यंत शिकलेल्या मुलाचे अकरावीत शिकत असलेल्या मुलीशी प्रेम जुळले आणि दोघेही पळून गेले. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधून परत आणले. गावातील मैदानात पंच, दोघांचे आई-वडील आणि गावकर्‍यांसमोर प्रेमीयुगुलाला अघोरी शिक्षा देण्यात आली.
मुलीला घोडी बनवून तिच्यावर तरुणाला बसवून वरात काढली. दोघांचे लग्नही लावून देण्यात आले. परंतु, भेटवस्तू म्हणून म्हशीचे शेण आणि काट्यांचे गुच्छ देण्यात आले.

पंचांनी मुलाच्या आई-वडिलांना पाच हजार तर मुलीच्या आई-वडिलांना 10 हजारांचा दंड ठोठावला. दोघे पुन्हा एकत्र दिसल्यास पाच लाखांचा दंड द्यावा लागेल, असा इशाराही त्यांच्या आई-वडिलांना देण्यात आला. गावात पुन्हा कोणी प्रेम करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी पंचांनी हा निर्णय घेतला. घटनेनंतर मुलीचे कुटुंबीय गाव सोडून अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेचे फोटो...