आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोदामध्ये दाम्पत्याची हत्या; दीड महिन्यांपर्यंत सडत होते मृतदेह, पण दुर्गंध सुटला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - स्नेहाबेन विनोद)
बडोदाः
मांजलपूर येथील तिरूपती सोसायटीच्या बंगल्यात एका दाम्पत्याचा मृतदेह मिळाला आहे. पोलिसांना या हत्येमागे दाम्पत्याची दत्तक घेतलेली मुलगी आणि तिच्या प्रियकरावर संशय आहे. पोलिसांच्या मते हे घर मागील ऑगस्ट महिन्यापासून बंद होते त्यामुळे ही हत्या दिड-दोन महिन्यापुर्वी झाली असावी.
मृत दाम्पत्याचे नाव श्रीहरी विनोद आणि स्नेहाबेन असे आहे. 63 वर्षीय श्रीहरी विनोद यांनी बँक ऑफ बरोडातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. मात्र त्यांची पत्नी स्नेहाबेन एल.आय.सी.मध्ये काम करत होत्या. या दाम्पत्याने एका मुलीला दत्तक घेतले होते. ही मुलगी सी.बी.एस.सी. शाळेत 10 वीत शिकत होती.
मागील दीड-दोन महिन्यांपासून या विनोद यांचे घर बंदच होते. त्यामुळे या घरात कोणतीतरी अप्रिय घटना घडल्याच्या संशयावरून स्नेहाबेनच्या जाऊबाईने पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनोद यांच्या घराचा तपास केल्यावर स्नेहाबेनचा मृतदेह पलंगावर तर श्रीहरी यांचा मृतदेह फरशीवर पडलेला मिळाला.
विनोद यांची मुलगी CBSE च्या 10 वर्गात शिकते. मात्र ती मागील 5 ऑगस्टपासून शाळेत जात नाहीये. शाळेच्या मुख्यध्यापकाने यासंदर्भात श्रीहरी यांना नोटीसही पाठवली होती. जर पुढील 7 दिवसात शाळेशी संपर्क साधला नाही तर तुमच्या मुलीचा प्रवेश रद्द करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस 30 सप्टेंबरला श्रीहरी यांच्या घरावर चिकटवण्यात आली होती. तर दुसरीकडे दीड-दोन महिन्यांपासून त्यांची मुलगी तिच्या प्रियकरासोबत वैष्णव पार्क येथे राहात आहे. जेव्हा ही मुलगी तिच्या प्रियकरासोबत निघून गेली तेव्हापासून विनोद दाम्पत्य दिसलेच नाही.
हत्येचा पुरावा:
- दुर्गंध पसरू नये म्हणून दोन्ही मृतदेहांवर केमिकल टाकण्यात आले होते.
- भिंतींवर रक्ताचे डाग लागले होते
- भिंतीवर लागलेले रक्त ज्या कपड्याने साफ करण्यात आले, तो कपडा बाजूच्या खोलीत सापडला.
- रक्ताचे विविध ठिकाणी डाग आहेत. त्यामुळे हत्येच्या आधी मृतकांमध्ये आणि हत्यार्‍यामध्ये ओढताण झाली असण्याचा संशय

पोलिस शोधत आहेत या प्रश्नांचे उत्तर
- मृतदेह दोन महिन्यांपासून सडत होते तरीही वास का पसरला नाही?
- या दाम्पत्याचा कोणाशीही संपर्क नव्हता तरीही त्यांच्या नातेवाईकांनी याबद्दल तक्रार का नाही केली ?
- हत्या कशाप्रकारे करण्यात आली?
- हत्येचे कारण काय?
- त्या दत्तक मुलीची पार्श्वभूमी काय होती, तिला कशाप्रकारे दत्तक घेण्यात आले?
पुढील स्लाईवर पाहा, या घटनेचे सर्व फोटो...