आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिकला न्यायालयाने फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पटेल आंदोलनाचे प्रमुख हार्दिक पटेलला गुरुवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. जे काही सांगायचे आहे ते लिखित स्वरूपात द्यावे, असे न्यायालयाने त्यांना म्हटले आहे. मंगळवार सायंकाळपासून बेपत्ता झालेले पटेल बुधवारी अचानक प्रकटल्याच्या प्रकरणावर न्यायालयाने हा "पब्लिसिटी स्टंट' वाटतोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होईल. दरम्यान, सरकारी वकिलांनी मोबाइल कॉल डिटेल्स न्यायालयास सोपवत सुओमाेटो दाखल करण्याची विनंती केली आहे. अपहृत हार्दिकची माहिती का कळवली नाही, असा सवाल न्यायालयाने हार्दिकच्या वकिलांना केला आहे.