आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: बाथरूमची लाईट ऑन करताच 'मगर' पाहून काळजाचा ठोका चुकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद जिल्‍ह्यातील वहेराई नावाच्‍या गावात आज भल्‍या पहाटे (सोमवार) खळबळ उडणून देणारी घटणा घडली. घरात साप निघाल्‍याचे तुम्‍ही ऐकले असले. मात्र या घरातील बाथरूममध्‍ये चक्क 'मगर' दिसली. झाल अस की, सकाळी उठल्‍यानंतर सवयीप्रमाण्‍ो बाथरूमला जाण्‍यासाठी भरतभाई पटेल यांनी लाईट ऑन केला आणि समोरचे दृष्‍य पाहून काळजाचा ठोका चुकला. भरतभाई यांना काही काळ काहीच सुचत नव्‍हते. मात्र सावध झाल्‍यानंतर समयसुचकता साधून त्‍यांनी बाथरूमचे दार बाहेरून बंद केले.
परिवारातील इतर लोकांना झोपेतून उठवले व घराबाहेर जाण्‍यास सांगितले. घरात चालू असलेली आरडा-ओरड पाहून शेजा-यांना झालेला प्रकार लक्षात आला. वनविभागाला कळवण्‍यात आले. काही काळात वनविभागाचे कर्मचारी घटनास्‍थळी पोहचले व त्‍यांनी मगरीला सुरक्षितीस्‍थळी नेऊन सोडले. वभविभागाच्‍या कर्मचा-यांनी दिलेल्‍या माहिती नुसार या मगरीचे वय साह वर्ष आहे. वहेराई गावाजळ असलेल्‍या नदीतून ही मगर आली असल्‍याचा आंदाज कर्मचा-यांनी व्‍यक्‍त केला आहे.
मगरीचे छायाचित्रे पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...