आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोदा निर्मित क्रायोजेनिक टाकीद्वारे इस्रोचे रॉकेट उड्डाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात) - बडोदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोच्या रॉकेटसाठी क्रायोजेनिक टाकी बनवणारे देशातील पहिले आणि जगातील चौथे शहर झाले आहे. वडोदराच्या कंपनीने इस्रो शास्त्रज्ञांच्या मदतीने टाकीची निर्मिती केली आहे.
अमेरिका, रशिया, फ्रान्सनंतर भारत
40 हजार लिटर साठवण क्षमता असणार्‍या क्रायोजेनिक टाकी निर्मितीत यश मिळाल्यामुळे भारत या क्षेत्रात स्वावलंबी होईल. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि फ्रान्सच्या कंपन्यांनी अशा टाकीची निर्मिती केली आहे. वडोदर्‍यातील क्रायोजेनिक साठवणूक टाकी स्वदेश तंत्रज्ञानातून बनविलेली पहिली टाकी आहे. 15 मीटर लांब 2.6 मीटर रुंद व 2.6 मीटर उंच टाकीत उणे 253 अंश तापमानावर हायड्रोजन जमा होईल. ही टाकी मल्टिलेयर सुपर इन्स्युलिन तसेच पोकळीयुक्त आहे. याच्या निर्मितीसाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. कालोल येथील खासगी कंपनीने इस्रो शास्त्रज्ञांच्या मदतीने अडीच वर्षांत टाकी तयार केली. याबाबत इस्रोचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एमवायएस प्रसाद म्हणाले, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बनावटीतील टाकीमुळे आपण विदेशांवर विसंबून राहणार नाहीत. अशा आणखी सात आठ टाक्या तयार केल्या जातील.

10 रुपयांमध्ये केवळ चार पैसे निधी
अंतराळ संशोधनासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद होते. सरकारचा एकूण खर्च 10 रुपये असेल, तर केवळ चार पैसे अंतराळ संशोधनावर खर्च होतात, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले. अपेक्षित निधीबाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. श्रीहरिकोटा येथे आणखी एक प्रक्षेपण स्थळ उभारण्यासाठी त्यांनी सरकारकडे परवानगी मागितली आहे. सध्या येथे दोन प्रक्षेपण स्थळे आहेत. यावर्षी येथून पीएसएलव्हीसह तीन उपग्रहांचे प्रक्षेपण झाले.