आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cycle Run 200 Km In One Litter Petrol Made By Young

एका लिटरमध्ये २०० किमी चालते ही सायकल, गुजरातच्या तरूणाचा नवा शोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेसाणाः माउन्ट अबुमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या जगदीश कुमार गेहलोत यांचे सुपूत्र राजकमल यांनी माऊन्ट अबूमध्ये शिक्षण घेऊन ऑटोमोबाईलची पदवी मिळवली आहे. राजकमलने ग्रामीण भागात राहाणाऱ्या लोकांच्या दळणवळणासाठी एक अनोखी सायकल डिझाईन केली आहे. राजकमल यांचा दावा आहे की, ही सायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 200 किलोमीटर चालते. रात्रीच्या वेळी या सायकलचा वापर करण्यासाठी यात लाईटसुध्दा लावण्यात आला असून अजून या सायकलवर संशोधन चालू आहे. जेव्हा या सायकलचे काम पुर्ण होईल तेव्हा ही सायकल पहिल्यांदा गुजरातमधील बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
पालनपुरमध्ये रेस्त्रा चालवणाऱ्या राजकमल यांनी सलग 3 वर्षे मेहनत करून ही सायकल बनवली आहे. या सायकलमध्ये 80 सी.सी. चे टू स्ट्रोक इंजिन लावण्यात आले असून यातून 40 से 50 किलोमीटर प्रति तास एवढा वेग मिळतो. पॅडल मारल्यानंतर क्लच सोडताच ही सायकल सुरू होते. पेट्रोलसाठी यामध्ये 2 लिटर क्षमतेची टाकी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल संपल्यावर पॅडल मारून ही सायकल चालवता येऊ शकते.
पुढील स्लाईडवर पाहा, या सायकलचे इतर फोटो...