अहमदाबाद (गुजरात)- येथील चांदलोडिया पुलाच्या खालून आंगडिया ज्वेलर्सचा कर्मचारी 75 लाख रुपये घेऊन जात होता. यावेळी पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार करीत रक्कम लुटून नेली. यात जेठालाल नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. चोरांना शोधण्यासाठी मोठी शोध मोहिम राबवली. परंतु, अद्याप चोरांना पकडण्यात आलेले नाही.
अहमदाबादमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या थराराचे PHOTOS आणि CCTV VIDEO पाहा पुढील स्लाईडवर....