आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक भास्करचा सुरतमध्ये शुभारंभ; देशात समूहाची 63वी, तर गुजरातमध्ये हिंदीची पहिली आवृत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- वस्त्रोद्योग नगरी सुरतमध्ये रविवारी दैनिक भास्करच्या ६३ व्या आवृत्तीचा शुभारंभ होणार आहे. गुजरातमध्ये भास्कर समूहाची ही पहिली हिंदी आवृत्ती आहे. समूहाचे गुजराती वृत्तपत्र ‘दिव्य भास्कर’ याआधीच सुरतसह संपूर्ण गुजरातमध्ये पोहोचले आहे.

सुरतमध्ये हिंदी वृत्तपत्र सुरू व्हावे, अशी चेअरमन कै. श्री रमेशचंद्र अग्रवाल यांची इच्छा होती. सुरतमध्ये हिंदी भाषिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हिंदी वृत्तपत्राची आवश्यकता आहे, असे त्यांना वाटत होते. राजस्थान, हरियाणा, बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशसह सर्व हिंदी भाषिक राज्यांतील लोकांची ये-जा सुरतमध्ये असते. संबंधित राज्यातील लोकांनी सुरतला देश-विदेशात ओळख दिली. रमेशजी कर्मयोगी होते. त्यामुळे समूह त्यांनी निश्चित केलेल्या तारखेलाच सुरतची हिंदी आवृत्ती सुरू करत आहे.
बातम्या आणखी आहेत...