आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये गर्भवती दलित महिलेला मारहाण, मेलेली गाय न काढल्यामुळे कुटुंबाला मारझोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्भवती संगतीलाही गावातील गुंडांनी मारहाण केली. - Divya Marathi
गर्भवती संगतीलाही गावातील गुंडांनी मारहाण केली.
पालनपूर - गुजरातमध्ये शनिवारी मेलेली गाय न हटवल्याचा राग मनात धरून दलितांना मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनुसार, बनासकाठा जिल्ह्याच्या कर्जा गावात जवळपास १० नागरिकांनी गरोदर महिलेसह दलित कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. या प्रकरणात ६ जणांना अटक केली आहे.

नीलेश रणावासिया यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. बटवरसिंह चौहान शुक्रवारी नीलेशच्या घरी आला आणि शेतात पडलेली मृत गाय उचलण्यास सांगितले. नीलेशने नकार दिला. यामुळे संतापलेल्या दरबार समाजाच्या १० नागरिकांनी रात्री नीलेशच्या कुटुंबावर हल्ला केला. नीलेशची गरोदर पत्नी संगीतासह तीन महिला व ३ पुरुषांना मारहाण केली.
बातम्या आणखी आहेत...