आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात: उणामध्ये पुन्हा दलितांवर हल्ला, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराचे नळकांडे फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यदिनी उणामध्ये झालेल्या दलित अस्मिता यात्रेसाठी जमलेला जनसमुदाय. - Divya Marathi
स्वातंत्र्यदिनी उणामध्ये झालेल्या दलित अस्मिता यात्रेसाठी जमलेला जनसमुदाय.
अहमदाबाद - गुजरातमधील उणामध्ये पुन्हा एकदा दलितांना मारहाण झाली आहे. 11 जुलै रोजी गोरक्षकांनी उणामध्ये पाच दलितांना अमानुष मारहाण केली होती. त्याविरोधात स्वातंत्र्यदिनी उणामध्ये दलित अस्मिता रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीतून घरी परतणाऱ्या 20 जणांवर जमावाने हल्लाबोल केला. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी लाठी चार्ज आणि अश्रूधुराचे नळकांडे फोडले. शांतते पारपडलेल्या रॅलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप होत आहे. त्याविरोधात मंगळवारी लोक रस्त्यावर उतरले. कन्हैय्याकुमार, रोहित वेमुलाच्या आईचा होता सहभाग
शांततेत घरी परतणाऱ्या आंदोलकांवर हल्ला, पोलिसांची बघ्याची भूमिका
- दलितांवर हल्ल्याची घटना सोमनाथ जिल्ह्यातील उणा जवळील समतर गावात सोमवारी सायंकाळी घडली. पीडितांचा आरोप आहे की पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांना मदतीचे आवाहन केल्यानंतरही ते पुढे आले नाही.
- या हल्ल्यात 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात 3 पोलिसांनाही किरकोळ मार लागला. सर्वांना हॉस्पिटलमध्य दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मारहाणीच्या आरोपत 26 जणांना अटक केली आहे.
- शांततेत घरी परतणाऱ्या दलित समाजाच्या लोकांवर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी उणा पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात आले.

पीडित भावनगर जिल्ह्यातील
- ज्यांच्यावर हल्ला झाला ते लोक भावनगर जिल्ह्यातील आहेत. सायकल आणि बाइकवरुन ते उणाला आले होते.
- 5 ऑगस्टला अहमदाबादहून निघालेल्या पदयात्रेचे 15 ऑगस्टला उणामध्ये दलित अस्मिता रॅलीत रुपांतर झाले. या रॅलीत सहभागी होण्यासाठी हे लोक आले होते.
उणा - भावनगर रोडवर वेढा टाकून मारहाण
- पीडितांनी सांगितल्यानुसार, रॅलीतून घरी परतत असताना उणा - भावनगर रोडवर एका जमावाने त्यांना आडवले आणि मारहाण केली.
- ज्या ठिकाणी 11 जुलैला पाच दलित तरुणांना अमानुष मारहाण झाली होती त्याच मोटा समधिया गावाजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- सोमवार रात्रीपासून उणामध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. संवेदनशील भागा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
रोहित वेमुलाची आई राधिका यांनी केले ध्वजारोहण
- दलित अस्मिता रॅलीत जेएऩयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्याकुमार, हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाच्या अत्याचाराचा बळी ठरलेला स्कॉलर रोहित वेमुला याची आई राधिका वेमुला आणि बालु सरवैय्या सहभागी झाले होते.
- राधिका वेमुला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्या पाच तरुणांना उणामध्ये मारहाण झाली होती त्यातील एकाचे बालु सरवैय्या वडील आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दलित अस्मिता यात्रेच्या दहा दिवसांच्या पदयात्रेनंतर सभेला जमलेला जनसमुदाय
> मुस्लिमांची संख्या लक्षणीय
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...