आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पित्याच्या निधनानंतर मुलीने केले मुुंडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवसारी (गुजरात) - दक्षिण गुजरातच्या या मुलीने वडिलांचे मुले ज्याप्रमाणे दिवसकार्य करतात त्याप्रमाणे सर्व विधी पार पाडले. कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगावर देशभरात जागृती व्हावी म्हणून स्वत:चे मंुुडण करून घेतले. तिचे केस एका संस्थेला दान करण्यात आले. दीपेंती भेंदा (२४) असे तिचे नाव असून ती म्हणाली, माझे वडील भरतभाई भेंदा गेल्या ७ वर्षांपासून कॅन्सरशी झगडत होते. कॅन्सरमुळे उपचारादरम्यान त्यांच्या डोक्यावरील केस गेले. शेवटी ११ नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. गुरुवारी त्यांच्या सुतकात जवळच्या नातेवाइकांनी मुंडण केले. लोकांना कॅन्सरची दाहकता कळावी, हाच उद्देश आहे.

सर्वात धाकटी मुलगी
भरतभाईंना तीन मुली आहेत. दीपेंती सर्वात धाकटी. तिने मुंडण करून कॅन्सर रोगावर लोकांमध्ये जागृती होण्यासाठी संदेश दिला. दीपंेतीचे वडिलांवर खूप प्रेम होते. पित्याच्या आजारपणात त्यांचे हाल पाहून तिला रडू यायचे. लोकांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन दीपेंतीने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...