आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्र्यांच्‍या सभेत शहीद जवानाच्या मुलीचा अपमान; थोडी तरी लाज बाळगा- राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या सभेतून शहीदाच्‍या मुलीला अक्षरश: फरफटत बाहेर काढण्‍यात आल्‍याने वाद निर्माण झाला आहे. - Divya Marathi
गुजरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या सभेतून शहीदाच्‍या मुलीला अक्षरश: फरफटत बाहेर काढण्‍यात आल्‍याने वाद निर्माण झाला आहे.

राजपीपला (नर्मदा)- गुजरातचे मुख्‍यमंत्री विजय रुपाणी यांच्‍या सभेतून एका शहीदाच्‍या मुलीला अक्षरश: फरफटत बाहेर काढण्‍यात आल्‍याची घटना घडली आहे. शुक्रवारी नर्मदा येथील राजपीपला येथे गुजरात निवडणुकीसाठी विजय रुपाणी सभा घेत होते, त्‍यादरम्‍यान ही घटना घडली. रुपाणी भाषण देत होते, तेव्‍हा शहीद अशोक तडवी यांची मुलगी रुपल तक्रार करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे जात होती. शासनाने आश्‍वासन देऊनही कित्‍येक वर्षांपासून प्‍लॉट दिला नाही, अशी रुपल यांची तक्रार होती. मात्र सुरक्षा गार्ड्सने मध्‍येच त्‍यांना थांबवले. रुपल यांनी याला विरोध केला असता सुरक्षा गार्ड्सनी अक्षरश: उचलून त्‍यांना बाहेर नेले. विशेष म्‍हणजे मुख्‍यमंत्री विजय रुपाणींनी याची दखलही घेतली नाही. भाषण संपल्‍यानंतर मुलीला न भेटताच ते तेथून निघून गेले. 


हा शहीदाचा अपमान- राहुल गांधी 
या घटनेवरुन काँग्रेस उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्‍हणाले, '15 वर्षांपासून हे कुटुंब मदत मागत आहे. मदत तर नाहीच मात्र आज न्‍याय मागणा-या शहीदाच्‍या मुलीचा अपमान केला गेला. थोडीतरी लाज बाळगा.'   


प्रत्‍येक वेळी शहीदाच्‍या पत्‍नीला केले जाते नजरबंद 
- शहीद अशोक तडवी यांचे कुटुंब केवडिया कॉलनीत राहते. येथे शुक्रवारी विजय रुपाणी यांची सभा होती. 
- अनेक वर्षांपासून हे कुटुंब सरकारी प्‍लॉटच्‍या मागणीसाठी संघर्ष करत आहे. मात्र प्रत्‍येक वेळी येथे एखाद्या नेत्‍याचा कार्यक्रम असल्‍यास शहीदाच्‍या पत्‍नीला नजरबंदमध्‍ये ठेवले जात असल्‍याची धक्‍कादायक माहिती आहे. मात्र यावेळी मुलीने मोर्चा संभाळला आणि ती रुपाणी यांच्‍या सभेत त्‍यांना जाब विचारण्‍यासाठी गेली. मात्र पोलिसांनी त्‍यांना अक्षरश: फरफटत बाहेर काढल्‍याने वाद निर्माण झाला आहे. 


2002मध्‍ये कुपवाडामध्‍ये शहीद झाले होते अशाक तडवी 
- केवडिया येथे राहणारे अशोक तडवी 2002मध्‍ये काश्‍मीरमधील कुपवाडा येथे शहीद झाले होते. 
- घटनेनंतर त्‍यांची मुलगी रुपलने म्‍हटले आहे की, पोलिसांनी माझ्याशी गैरवर्तवणुक केली आहे. याची मी महिला आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या घटनेचे फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...