आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Ibrahim\'s Rival Bablu Shrivastav Given Commando Security

PHOTOS: दाऊदच्या शत्रू ‘डॉन’ला 21 कमांडोंच्या सुरक्षेत सुरतला आणले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत (गुजरात)- अमजल दलाल फायरिंग प्रकरणी आरोपी गॅंगस्टर बबलू श्रीवास्तव याला कडेकोट सुरक्षेत सुरतच्या न्यायालयात सादर करण्यात आले. सध्या तो उत्तर प्रदेशातील बरेली तरुंगात आहे. गेल्या वेळी त्याने न्यायालयाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी नामंजुर केली होती.
बबलूच्या जिवाला आहे धोका
बबलू श्रीवास्तवच्या जिवाला धोका असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कमांडो आणि सशस्त्र पोलिसांचे सुरक्षा कवच त्याला देण्यात आले आहे. अंडरवर्ल्डकडून त्याच्या जिवाला धोका असल्याचे समजते. बरेली जेलमधून बबलू श्रीवास्तवला 21 कमांडोंच्या सुरक्षेत रेल्वेतून सुरतला आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
सुरतशी आहे संबंध
700 कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणी नाव आलेल्या अफरोज फत्ता याच्याकडे त्याने 150 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अफरोजने खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर बबलूच्या शुटर्सनी अफरोजवर गोळीबार केला होता. यावेळी शुटर्सनी चुकीने अफरोजच्या जागी अमजद दलाल याच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे अफरोज यावेळी वाचला होता.
दाऊदचा शत्रू आहे बबलू
गेल्या 21 वर्षांपासून बरेली तुरुंगात असलेला बबलू श्रीवास्तव एके काळी किडनॅपिंग किंग या नावाने कुप्रसिद्ध होता. त्याचे दाऊदसोबत शत्रूत्व आहे. बबलूने पोलिसांना सांगितले आहे, की मी जेव्हा दुबईला होतो तेव्हा दाऊदने मला ठार मारण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता. मी सिंगापूर एअरपोर्टवर असल्याची माहिती दाऊदने इंटरपोलला दिली होती. त्यामुळे मला अटक झाली.
भारतातही बबलूच्या हत्येचा प्रयत्न
एवढेच नव्हे तर जुन 2012 मध्ये अटक करण्यात आलेला राजेश हाही बबलूला ठार मारण्यासाठी लखनौला आला होता. राजेशने बबलूच्या हत्येसाठी लखनौ, गाजियाबाद किंवा बरेली तुरुंगाबाहेर हल्ला करण्याचा कट रचला होता. पण तो त्यात यशस्वी झाला नाही. पोलिसांनी त्याला अटक केली. बबलूची हत्या करण्यासाठी डी-कंपनीने राजेशला कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली होती.
पुढील स्लाईडवर बघा, बबलू श्रीवास्तवचे आणखी फोटो...