आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING: मृत्यु झाल्यानंतर 11 तासांनी उठून बसले हे आजोबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पहिल्या छायाचित्रात मृतावस्थेत आणि दुसर्‍या झायाचित्रात 11 तासांनंतर उठून बसलेले 77 वर्षीय गणेशभाई पटेल)
महेसाणा- सध्याचे युग झपाट्याने बदलत आहे. केव्हा, कुठे काय होईल, हे काही सांगता येत नाही. आता हेच पाहा, गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यातील बोकरवाडा गावात 77 वर्षीय गणेशभाई पटेल हे निधनानंतर तब्बल 11 तासांनी पुर्नजीवित झाले आहे. या घटनेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच विज्ञानालाही आव्हान दिले आहे.

विसनगर तालुक्यातील बोकरवाडा गावातील रहिवासी गणेशभाई पटेल यांची मंगळवारी (25 मे) रोजी अचानक तब्बेत बिघडली. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डॉक्टरांनी गणेशभाई यांनी मृत घोषित केले. गणेशभाईच्या निधनाची बातमी समजताच सगळे नातेवाईक, गावातील मंडळी त्यांच्या घरी जमले. दुसर्‍या दिवशी सकाळी गणेशभाईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍याचे ठरवण्यात आले. परंतु आश्चर्य म्हणजे बुधवारी (26 मे) सकाळी साडे पाचलाच गणेशभाई यांच्या मृत शरीरात प्राण परतला. मृत्युच्या शैय्येवरच ते हलचाल करू लागले आणि डोळे चोळत सगळ्यांसमोर स्वत: उठून बसले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पुर्नजीवित झालेले गणेशभाई पटेल
बातम्या आणखी आहेत...