आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delegation Of Us Mp Came Gujrat To Meet Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या विकास मॉडेलची अमेरिकेत चर्चा; अमेरिकेचे खासदार आले भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - अमेरिकेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्यावर अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, तिथेही मोदींच्या विकासाच्या मॉडेलची चर्चा आहे. गुरूवारी अमेरिकन संसदेचे शिष्टमंडळ मोदींच्या भेटी साठी आले आहे. या भेटीत अमेरिकेसोबत व्यापारी संबंध वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता गुजरात सरकारने व्यक्त केली आहे.

अमेरिकेहून आलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हाऊस ऑफ रिप्रेजिंटेटीव्हचे सदस्य एरन चॉक करीत आहेत. नॅशनल इंडियन अमेरिकन पब्लिक पॉलिसी या संस्थेच्या माध्यमातून हे शिष्टमंडळ आले असून ते भारतातील प्रमुख अधिकारी, खासदार आणि उद्योजकांना भेटणार आहेत. भारताच्या दौ-यावर असेलेले हे शिष्टमंडळ २६ मार्च ते ७ एप्रिल पर्यंत गुजरातसह बंगळुरू आणि दिल्लीलाही जाणार आहे.