आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: Amit Shah In Ahmedabad On Delhi Counting

आधी लग्न पोराचे मग दिल्लीचे, Counting ला अमित शहा अहमदाबादेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- जयच्या साखर पड्यात केंद्रीय मंत्री अरुण जेटले.)
अहमदाबाद- दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी भाजपचे अध्यक्ष अमित शहा अहमदाबादमध्ये आहेत. आज त्यांचा मुलगा जयचे लग्न आहे. यासाठी ते अहमदाबादला आले आहेत. एवढेच नव्हे तर लग्नाच्या वेळी भाजपमधील वरिष्ठ नेतेही अहमदाबादमध्ये राहण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद येथून अमित शहा यांचे दिल्लीच्या घडामोडींवर लक्ष असून भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. निकालांवरुन आम आदमी पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तर नरेंद्र मोदी यांचा विजयीरथ पहिल्यांदा थांबलेला दिसून येईल. त्यामुळे जयच्या लग्नाचा आनंद जरा कमी झालेला असेल.
शहा शनिवारी रात्रीच दिल्लीत व्होटिंग झाल्यावर अहमदाबादला आले होते. त्यानंतर कर्नावती क्बलमध्ये जाऊन तयारीचा आढावा घेतला होता. आज जयचे लग्न असून 12 फेब्रुवारीला रिसेप्शन आहे. यावेळी सुमारे तीन हजार पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईडवर बघा, जयच्या लग्नाची पत्रिका... आणि जयच्या साखरपुड्याचे फोटो...