आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! पाणीपुरीच्या पाण्याने होऊ शकतो कॅन्सर, संशोधनातून झाले सिध्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: फोटो: अन्न व वितरण विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणीपुरीचे पाणी नष्ट केले)


वडोदरा (गुजरात) -
पाणीपुरीचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, हे पाणी केवळ यकृतासाठी धोकादायक नाही तर यामुळे तुम्हाला कॅन्सर सारखा भयंकर आजारही होऊ शकतो. पाणीपुरी बनवणारे या पाण्यामध्ये रंग आणि खराब मावा वापरत असल्याचे आढळून आले आहे.
वडोदराच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने शहरातील शेकडो पाणीपुरी वाल्यांच्या गाड्यांवर मागील दहा दिवसांपासून छापेमारी सुरू केली, तेव्हा याबद्दलचा खुलासा झाला. तपासणीत असे आढळून आले आहे की, पाणीपुरीचे पाणी अशुध्द असते, तसेच यांमध्ये पुदीन्याऐवजी सिंथेटीक रंगांचा वापर केला जातो. यामुळे याच्या जास्त सेवनाने पोटातील आतड्यांवर वाईट परिणाम होतो. या आतड्यांवर झालेला परिणाम कँसर सारख्या भयंकर आजाराला निमंत्रण देऊ शकतो.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, फोटोंसोबत सविस्तर बातमी...