बडोदा- देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये आजही काही शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज आपला जीव मुठीत घेऊन शाळेत पोहोचावे लागते. उदयपूर जिल्ह्यातील 16 आदिवासी गावातील जवळपास 125 विद्यार्थी-विद्यार्थिनींना 600 मीटर रुंद हीरन नदी पोहत जाऊन पार करावी लागते. यासाठी हे विद्यार्थी पितळाच्या घागरीची मदत घेतात. स्थानीय भाषेत त्याला 'गोहरी' म्हणून संबोधित केले जाते.
'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांना प्राण मुठीत घेऊन दररोज नदी पार करून शाळेत पोहोचावे लागते. मागील सात वषर्रंपासून नदीवर पूल बनवण्याचे आश्वासान दिले जात आहे. परंतु आजपर्यंत याठिकाणी पुल उभारण्यात आला नाही.
शाळेत जावे लागते जीव मुठीत घेऊन...नववीच्या इयत्तेत शिक्षण घेणारी गीता ही देखील आपल्या मित्रांसोबत नदी ओलांडून दररोज सकाळी सात वाजता शाळेत पोहोचावे लागते. या दरम्यान, सुरक्षेसाठी एका विद्यार्थिनीचे वडील सर्व विद्यार्थ्यांसोबत नदी पोहोत पार करतात. एवढेच नव्हे नदीच्या दोन्ही काठावर नागरिक उभे राहून विद्यार्थ्यांना सतर्क करत असतात. नदीची पाण्याची पातळी वाढली तर त्यांना नदी पार करण्यासाठी त्यांना मदत करतात. 600 मीटर रुंदीची नदी पार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना 30 मिनिटांचा कालावधी लागतो. वह्या-पुस्तके एका प्लास्टिकच्या कॅरीपॅगमध्ये गुंडाळलेली असते. चप्पल अथवा बुट सुरक्षित राहावे म्हणून त्यांना पितळाच्या घागरीत ठेवले जातात.
करावी लागते पाच किलोमीटरची पायपीट...
नदीत ओलांडतांना विद्यार्थिनींचे चूड़ीदार-कुर्ता स्कूल ड्रेस भिजून जातात. नदी ओलांडूत विद्यार्थी सेवाडा गावाता पोहोचतात. तेथे विद्यार्थिनींना शाळेचा गणवेश सुकवण्यासाठी उन्हात उभे राहावे लागते. तेथून उतावाड़ी गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत पोहोचण्यासाठी पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी पायपीट करावी लागते.
सरकारने आतापर्यंत केवळ आश्वासनच दिले...
मागील सात वर्षांपूर्वी या नदीवर पुल बनवण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. त्याकडे अधिकार्यांनी कानाडोळा केला. सेवाडा गावाचे सरपंच म्हणाले, मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडेही निवेदन पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री पटेल म्हणाल्या की, पुलाचे काम मंजूर करण्यात आले आहे. लवकरच कामास सुरुवात होणार आहे. परंतु प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागत आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने नदीची पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा पोहोत नदी पार करताना विद्यार्थी...
(फोटो: पितळाच्या घागरीच्या मदतीने हीरन नदी पार करताना शाळकरी विद्यार्थी)