आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी वंजारा यांना आले \'अच्छे दिन\'; म्हणाले- सर्व चकमकी योग्यच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर (गुजरात)- इशरत जहाँ प्रकरणासह सर्व चकमकींच्या अनेक प्रकरणांत आरोपी असलेले गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी शुक्रवारी गांधीनगरमध्ये प्रवेश केला. त्यांना गेल्या नऊ वर्षांपासून राज्यात प्रवेश करण्याला कायदेशीर बंदी घालण्यात आली होती.या वेळी वंजारा म्हणाले, इशरत जहाँसह इतर सर्व चकमकींची सर्व प्रकरणे, ज्यात गुजरात पोलिस व अन्य अधिकारी आरोपी होते ती सर्व प्रकरणे खरी आणि सत्य आहेत. देशाची सर्वोच्च तपास संस्था आयबीच्या सूचनेनंतरच या चकमकींची कारवाई करण्यात आली होती. परंतु देशद्रोही नेत्यांनी राजकीय स्वार्थासाठी त्यात मला व माझ्या सहकाऱ्यांना कटकारस्थान करून खोट्या खटल्यांमध्ये अडकवले. या चकमकी झाल्या नसत्या तर दहशतवाद्यांनी गुजरातला दुसरे काश्मीर बनवले असते. वंजारा यांनी या वेळी लोकांना राज्य व केंद्र सरकारचा विकासचा अजेंडा पुढे नेण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाला जनआंदोलन बनवण्याचे आवाहन केले.

या वेळी इशरत जहाँ प्रकरणातील सहआरोपी पी. पी. पांडेय यांनी वंजारा हे पुढील वर्षी गुजरामध्ये होणाऱ्या िवधानसभा िनवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा केला. त्यावर वंजारा म्हणाले, "मी मुख्यमंत्री (सीएम) आधीपासूनच आहे. सी.एम. म्हणजे कॉमन मॅन.'

तत्पूर्वी अहमदाबाद विमानतळावर वंजारा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुलगा पृथ्वीने विमानतळावरच वडिलांना नवी मर्सिडीझ भेट देऊन व कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केली, नंतर गांधीनगरच्या टाऊन हॉलमध्ये समाजाच्या वतीने स्वागत समारंभात ते उपस्थित राहिले.

तेथे ते म्हणाले देशाला दहशतवादी, गुन्हेगार इतकेच नव्हे तर पाकिस्तान- चीनसारख्या देशांपासून जितका धोका नाही, तितका धोका देशद्रोही नेत्यांपासून आहे. असे वाटते की आज देशात देशद्रोही नेत्यांचा जणू काही हंगामच आला आहे. मला फासावर लटकवावे, अशी अनेकांची इच्छा होती. आठ वर्षे मला तुरुंगात घालवावी लागली. परंतु मला त्याबाबत खेद नाही. कारण शूरांचीच कसोटी लागते. सीता, प्रल्हादला परीक्षा द्यावी लागली. रावण, हिरण्यकशपूला नाही.

इशरत जहाँ चकमकीमुळे होते वादात
२००७ मध्ये वंजारा यांना इशरत जहाँ कथित चकमकप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आठ वर्षे तुरुंगात ते होते. ते गेल्या वर्षी जामिनावर सुटले होते. पण गुजरात कोर्टाच्या िनर्देशानंतर मुंबईत राहत होते. परंतु अहमदाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना एप्रिलमध्ये गुजरात प्रवेश करण्याची मुभा दिली होती.
गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी शुक्रवारी गांधीनगरमध्ये आगमन झाले. त्या वेळी वंजारा समाजातर्फे चांदीची तलवार भेट दिली. त्यानंतर वंजारा यांनी पत्नीसोबत नृत्य करून अानंद साजरा केला. (इन्सेट) या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी पी. पी. पांडेय यांनी त्यांना सॅल्यूट ठोकला.

वंजारांना घेण्यासाठी 40 लाख रुपयांची मर्सिडीज
वंजारा यांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा 40 लाख रुपयांच्या मर्सिडीजत आला होता. गांधीनगरमध्ये एक कार्यक्रमाचेही आयोजन करण्‍यात आले आहे त्यात. वंजारा यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान, वंजारा यांना गुजरातमध्ये परत येण्यास सीबीआयच्या विशेष कोर्टाने परवानगी दिली होती. वंजारा यांना मागील वर्षी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. गुजरातमध्ये प्रवेश न करण्याची अट घालण्यात आली होती. कोर्टाने ही अट शिथिल केल्यामुळे वंजारा तब्बल नऊ वर्षांनंतर गुजरातमध्ये दाखल झाले आहे.

काय म्हणाला, वंजारांचा मुलगा?
- पृथ्वी वंजाराने सांगितले, 'सीबीआयच्या विशेष कोर्टाने वंजारा यांनी गुजरातमध्ये परतण्याची परवानगी दिली आहे. याचा आम्हीला खूप आनंद झाला आहे.
- वंजारा यांना मागील वर्षी सशर्त जामीन मिळाला होता. वंजारा यांना मुंबईतून बाहेर जाता येणार नसल्याचे कोर्टाने निर्देश दिले होते. तेव्हापासून मुंबईत एकटेच राहात होते. या काळात वंजारायांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे पृथ्वी वंजाराने सांगितले.

वंजारा यांना आले ‘अच्छे दिन'
इशरत जहॉं एन्काउंटरप्रकरणात गुजरात पोलिसांची भूमिका योग्य होती. त्यांनी काहीच चुकले केले नसल्याचे वक्तव्य वंजारांनी जाम‍ीन मंजूर झाल्यानंतर केले होते. दहशतवाद आंतरराष्ट्रीय समस्या असून पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व दिल्याचे वंजारा म्हटले. या प्रकरणातील सर्व आरोपी निरापराध असल्याचे वंजारा म्हणाले होते.

आठ वर्षांपासून गुजरात पोलिसांचे 32 कर्मचारी तुरुंगात आहेत. ते निर्दोष आहेत. नागरिकांची सुरक्षा हा पोलिसांचा धर्म असतो. प्रथमच गुजरात पोलिसांना न्याय मिळाला आहे. इतर सहकारीही लवकरच मुक्त होतील, असे वंजारा म्हणाले. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

काय आहे इशरत जहॉ एन्काउंटर प्रकरण?
15 जून 2004 रोजी अहमदाबाद पोलिस व तत्कालीन पोलिस उपायुक्त वंजारा यांनी 19 वर्षीय इशरत जहाँ, तिचा मित्र जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्लई आणि त्यांच्यासोबत असलेले अमजद अली राणा व जिशान जोहर यांना पोलिस एन्काउंटरमध्ये ठार केले होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला होता. अशाच प्रकारच्या सोहराबुद्दीन व तुलसी प्रजापती एन्काउंटर प्रकरणाचाही आरोप वंजारांवर होता. गेल्या आठ वर्षांपासून ते तुरुंगात होते.

कोण आहे वंजारा व तुरुंगात काय केले?
- साबरकांठा जिल्ह्यातील इलोल येथील रहिवासी वंजारा यांनी हिम्मतनगरमधून ग्रॅज्युएश केले.
- कॉलेज जीवनात त्यांनी अनेक कविता लिहिल्या.
- एलएलबीची पदवी घेतल्यानंतर ते गुजरात पोलिस विभागात रुजू झाले.
- इशरत जहॉ एन्काउंटर प्रकरणी वंजारा यांना अटक झाली. तुरुंगात असताना वंजारा यांनी मानवाधिकाराशी (ह्यूमन राइट्स) संबंधित पुस्तके वाचली.
- अन्नामलाई यूनिव्हर्सिटीतून मानवाधिकार विषयात पदवी प्राप्त केली.
- तुरूंगात कविता देखील लिहिल्या.

पुढील स्लाइडवरील फोटोंमध्ये पाहा, अहमदाबाद एअरपोर्टवर वंजारा यांच्या जंगी स्वागत करण्यात आले...