अहमदाबाद - बॉलिवुड अभिनेता अमिर खान याने भारताची प्रतिमा मलिन केली असून, त्याने असहिष्णुतेबाबत केलेले वक्तव्य पूर्णत: चुकीचे होते. त्यामुळे 'अतुल्य भारत' या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदावरून त्याची हकालपट्टी केली ते उचितच केले, असे मत औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे (डीआयपीपी) सचिव अमिताभ कांत यांनी व्यक्त केले. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिजाइनच्या 36 व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कांत यांच्या मतानुसार, अमिरने काय चूक केले....
- कांत म्हणाले, “ब्रॅण्ड अॅम्बेसडरचे काम हे ब्रॅण्डला प्रमोट करण्याचे असते. विदेशी पर्यटकांना भारताकडे आकर्षित करणे हा अतुल्य भारत या मोहिमेचा उद्देश आहे. पण, या मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसडरच तर देश असहिष्णू असल्याचे सांगत असेल तर काय परिणाम होईल ?”
- त्यांनी म्हटले, “आमिरने देशाच्या ब्रॅण्ड आयडेंटिटीला नुकसान पोहोचवले आहे. त्याचे मत ऐकून विदेशी पर्यटक
आपल्या देशात येणे पसंत करणार नाहीत. त्याचे काम ब्रॅण्डला प्रमोट करणे आहे त्याला उद्धस्त करणे नाही.”
- अतुल्य भारत या मोहिमेतून अमिरच्या हकालपट्टीबाबत कांत यांना प्रश्न विचारला होता.
#Intolerance वर काय म्हणाला होता आमिर
आमिरने देशातील असहिष्णुतेबद्दलचे वक्तव्य केले होते. 'आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हे मी एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. हे नाकारू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारत सोडून जायचे का, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे आमिरने म्हटले होते. आमिरच्या वक्तव्यावरुन देशात चौफेर रान पेटले होते. सोशल मीडियावर तर आमिरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला.
का उठला होता असहिष्णुतेचा मुद्दा
- उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस घरात ठेवल्याच्या संशयावरुन ठेचून मारण्यात आले होते.
- त्याआधी कन्नड लेखक एम.एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
- या घटनांचा निषेध करण्यासाठी साहित्यिक, कलाकार, चित्रपट निर्माते यांनी पुरस्कार परत केले होते.
- विरोधकांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी व पाठीराख्या संघटना देशात धार्मिक आधारावर तणाव वाढवत असल्याचा आरोप केला होता
पुढे वाचा, 'पीके'साठी आयएसआयची मदत घेतल्याचा आरोप...