आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब प्रकार: हिंदुंसाठी भगवा तर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी हिरवा \'युनिफॉर्म\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- गुजरातमधील शाहपूर शाळेत भगव्या युनिफॉर्ममध्ये विद्यार्थी)
अहमदाबाद- गुजरातमधील अहमदाबाद महापालिका संचलित शाहपूर पब्लिक स्कूल आणि दानी लिम्डा पब्लिक स्कूलमधील अजब प्रकार समोर आला आहे. या दोन्ही स्कूलमधील विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म वेगवेगळ्या रंगाचा आहे. शाहपूर स्कूलमधील सर्व विद्यार्थी भगव्या रंगाचा युनिफॉर्ममध्ये दिसतात. कारण या स्कूलमध्ये बहुतांश विद्यार्थी हिंदु आहेत. दानी स्कूलमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या युनिफॉर्मचा रंग हिरवा असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.


अहमदाबाद महापालिकेच्या एकूण 454 शाळा आहेत. या सर्व इंग्लिश मीडियममध्ये आहेत. विशेष म्हणजे सर्व स्कूलमधील विद्यार्थी ब्लू आणि व्हाइट यूनिफॉर्ममध्ये दिसतात. परंतु शाहापूर आणि दानी स्कूलमधील विद्यार्थीच मात्र भगव्या आणि हिरव्या रंगातील युनिफॉर्ममध्ये दिसतात. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

की,
युनिफॉर्मचा धर्माशी कोणताही संबंध नाही...
दानी पब्लिक स्कूलचा हिरवा आणि शाहापूर स्कूलचा भगवा युनिफॉर्मचा धर्माशी काही संबंध नसल्याचे एएमसी स्कूल बोर्डाचे चेअरमन भावसार यांनी सांगितले आहे. आमच्या समोर पिंक आणि ब्लू रंगाचा पर्याय उपलब्ध होता. परंतु सुविधेच्या दृष्टीकोनातून आम्ही एका स्कूलसाठी भगवा आणि दुसर्‍या स्कूलसाठी हिरवा रंग निवडला आहे.
दरम्यान, दानी स्कूलमध्ये 98 टक्के विद्यार्थी मुस्लिम आहेत. त्याचप्रमाणे शाहपूर स्कूलमध्ये 95 टक्के विद्यार्थी हिंदु आहेत. शाहपूर स्कूलचा युनिफॉर्म एक सामाजिक संस्थेने स्पॉन्सर केला आहे. चेअरमन भावसार हे स्वत: त्या संख्येचे सदस्य आहेत. दानी स्कूलचा नवा युनिफॉर्म (हिरवा टीशर्ट आणि ब्लॅक पॅंट) यंदा प्रजासत्ताक दिनापासून लागू करण्‍यात आला आहे.