आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चितेवर झोपवलेल्या मृतदेहाने पकडले मित्राचे बोट, स्मशानातच बोलवावा लागला डॉक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात)- शहरातील जेतपूर स्मशानात काल सायंकाळच्या सुमारास प्रचंड गोंधळ उडला. अंत्यसंस्कार करण्यासाठी आणलेली व्यक्ती जिवंत असून श्वास घेत असल्याची अफवा पसरली. एवढेच नव्हे तर मृतदेहाने मित्राचे बोट पकडल्याचेही सांगितले गेले. त्यानंतर स्मशानातच डॉक्टर बोलविण्यात आला. सुमारे 10 मिनिटे वैद्यकीय तपासणी केल्यावर व्यक्ती मृतच असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर अंत्यसंस्कार आटोपण्यात आले.
देवेंद्र पंड्या असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. आजाराने देवेंद्रचा मृत्यू झाला. तो हार्ट पेशंट होता. गेल्या तीन दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती होता. डॉक्टरांनी काल सकाळी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह जेतपूर स्मशानात आणण्यात आला.
मित्राचे बोट पकडले
देवेंद्रच्या एका मित्राने सांगितले, की मी त्याच्या मृतदेहाजवळ उभा होतो. तेव्हा त्याने माझे हाताचे एक बोट पकडले. काही लोकांनी हे बघितले. त्यामुळे लगेच स्मशानात डॉक्टरला बोलविण्यात आले. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांची टीमही स्मशानात दाखल झाली. परंतु, वैद्यकीय तपासणी केल्यावर डॉक्टरांनी देवेंद्रला मृत घोषित केले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्मशानात दाखल झाली पोलिस टीम... स्मशानातील असे उडाला गोंधळ...