आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या डॉक्टरांना सापडला नवा ब्लडग्रुप, जगात दुसरीकडे कुठेही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातच्या डॉक्टरांनी शोधला नवा रक्तगट. - Divya Marathi
गुजरातच्या डॉक्टरांनी शोधला नवा रक्तगट.
सूरत - सूरतमधील एका युवकाचा रक्तगट पाहून डॉक्टरांनाच प्रश्न पडला आहे. त्याचे कारणही विशेष आहे. सर्व साधारणपणे आढळून येणाऱ्या A, B, O, AB यापैकी एकाही रक्तगटासोबत त्याचे रक्त मॅच होत नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत या युवकाचा रक्तगट जुळत नाही. हा युवक ना रक्तदान करु शकतो ना, याला कोणाचे रक्त दिले जाऊ शकते. डॉक्टरांनी त्याच्या रक्तगटाचे नाव INRA ठेवले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली मान्यता...
- INRA या रक्तगटाच्या नावातील पहिली दोन अक्षरे ही भारताच्या इंग्रजी नावातील अद्याक्षरे आहेत तर उर्वरीत दोन अक्षरे युवकाच्या नावातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या रक्तगटाला प्रमाणित केले आहे. डॉक्टर युवकाच्या या वेगळ्या रक्त गटावर आणखी संशोधन करीत आहेत.
- सूरतमधील लोक समर्पण रक्तपेढीच्या डॉक्टरांनी सर्वप्रथम या रक्तगटाची तपासणी केली. येथील डॉ. सनमुख जोशी, डॉ. किंजल मेंदपरा आणि अंकित शेलडिया यांच्या टीमने रक्ताचे नमुने तपासून ते WHO ला पाठवले.
- युवकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचेही रक्त तपासण्यात येत आहे.
- आतापर्यंत मानवी शरीरामध्ये चार ( A, B, O, AB)प्रकारचे रक्तगट असल्याचे ज्ञात आहे. मात्र युवकाचे रक्त यापैकी एकाही गटाशी जुळत नव्हते. युवकाच्या रक्ताचे नमुने WHO कडे पाठवण्यात आले होते.
- या लॅबमध्ये जगात ज्ञात असलेले सर्वप्रकारचे रक्तगट उपलब्ध आहेत. अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या मात्र कोणत्याच रक्तगटासोबत युवकाचे रक्त मॅच होत नव्हते.
जगात सात दुर्मिळ रक्तगट, ते कोणाशीच जुळत नाही
- जगामध्ये फक्त सात असे रक्तगट आहेत जे कोणाशीही जुळत नाहीत. डॉ. जोशींनी सांगितले, की याला वैद्यकीय भाषेत 'COLTOL' म्हटले जाते.
- यातील एक भारतात आहे. याशिवाय बॉम्बे ब्लड ग्रूप आहे, जो सात हजारांपैकी एखाद्यामध्ये आढळतो.
- मेडिकल कॉलेज ऑफ बडोदाचे प्रा. डॉ. रमेश पटेल म्हणाले, 'असे रक्तगट हे दुर्मिळातील दुर्मिळ असतात.'
- अशा व्यक्तीला रक्ताची गरज निर्माण झाली तर फार कठीण होऊन जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...