आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानाच्या पाठीवर बसून नर्मदेत स्नान करते हे माकड, बाबासाठी आणते पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वानाच्या पाठीवर बसून स्नान करताना माकड - Divya Marathi
श्वानाच्या पाठीवर बसून स्नान करताना माकड
इंदूर/कसराववड - श्वान आणि माकडाची मैत्री तुम्ही चित्रपटांमध्ये अवश्य पाहिली असेल परंतु वास्तवामध्ये पाहण्याची इच्छा असेल तर नर्मदा तीरावर नावडातौडी स्थित शालिवाहन मंदिरात जा.

भिवानी (हरियाणा) येथील संत पवनगिरी महाराज गुजरातमध्ये तपश्चर्या करून येथे नर्मदा नदीवर आले आहेत. सध्या ते शालिवाहन आश्रमामध्ये थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत एक श्वान आणि माकड आहे. या संताने सात वर्षांपासून मौन धारण केलेले आहे.

या तिघांचेही तप, ध्यान आणि स्नान अनोखे आहे. श्वानाच्या पाठीवर बसून माकड नर्मदा नदीमध्ये स्नान करते. एवढेच नाही तर कलशामध्ये पाणी भरून आश्रमात घेऊन येते आणि आचमन करते. मौन तपस्वीसोबत दोघेही दोन वेगवेगळ्या स्वभावाचे प्राणी दिनचर्येत व्यस्त राहतात. स्थानिक लोकांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...