आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: कोणत्याही पुराव्याशिवाय 500 रुपयांत बनावट अाधार कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- आधार कार्डाची चाकोरीबद्ध व्यवस्था उद््ध्वस्त करून खुलेआम त्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे. ओळखपत्र न देता ५०० रुपयांत आधार कार्ड तयार केले जाते. ओळखपत्र असले तरी २०० रुपये द्यावेच लागतात. सरकारकडून आधार कार्डाचे वितरण मोफत करण्यात येते तरीसुद्धा अहमदाबाद महापालिकेच्या परिसरातील सिद्धिविनायक झेरॉक्स दुकानात सर्रास आधार कार्डाची विक्री केली जात आहे.  

सुरुवातीला अर्जदाराकडून आधार कार्ड तयार करण्यासाठी लागणारी फिंगर प्रिंटसह बायोमेट्रिक्सची सर्व प्रक्रिया पार पाडली जाते.  या झेरॉक्स दुकानातून “दिव्य भास्कर’च्या प्रतिनिधीने ओळखपत्र  न देता आधार कार्ड तयार करवून देण्याची सर्व प्रक्रिया पाहिली.  
एका महिलेने अाधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतेही ओळखपत्र न देता आधार कार्ड तयार करवून घेतले. नवे आधार कार्ड तयारही झाले असून त्याचा क्रमांक २७७५-२६५८... असा आहे. आधार कार्डासाठी नाेंदणी केल्यानंतर १० ते १२ दिवसांनी अर्जदारास ई-आधारकडून संदेशही प्राप्त झाला आहे.  

१० हजार आधार कार्ड तयार केल्याचा दावा
आतापर्यंत दहा हजार आधार कार्ड तयार केली गेली आहेत, असा खुद्द एजंटचाच दावा आहे. यासाठी खूप मोठी सेटिंग असून ती तुमच्या कल्पनेबाहेर आहे, असे या एजंट महाशयांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...