आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dushkarm Near Habibganj Station For 3 Hours, Police Daughter Has To Wait 24 Hours For FIR

भोपाळमध्ये विद्यार्थिनीवर 3 तास गँगरेप, पोलिसांची असंवेदनशीलता; गुन्हा नोंदवायला उशीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी संध्‍याकाळी कोचिंग क्‍सासहून परतताना विद्यार्थीनीसोबत ही घटना घडली. - Divya Marathi
मंगळवारी संध्‍याकाळी कोचिंग क्‍सासहून परतताना विद्यार्थीनीसोबत ही घटना घडली.
भोपाळ- मध्‍यप्रदेशची राजधानी भोपाळमध्‍ये कोचिंग क्‍लासहून परतणा-या 19 वर्षीय विद्यार्थीनीसोबत गँगरेप झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. हबीबगंज रेल्‍वे स्‍टेशनजवळ या 4 आरोपींनी मुलीचे अपहरण केले. नंतर तेथील झुडुपांमध्‍ये नेत तिच्‍यावर सामुहीक बलात्‍कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
तिची हत्‍या करणार होते आरोपी 
- पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, पिडीता भोपाळमधील एमपीनगर परिसरातील कोचिंग क्‍लासमध्‍ये युपीएससीची तयारी करत आहे. 31 ऑक्‍टोबररोजी संध्‍याकाळी 7.30 वाजता ती कोचिंग क्‍लास संपवून घरी येत होती. तेव्‍हाच रेल्वे स्‍टेशनजवळ 4 मुलांनी तिला घेरले. प्रथम त्‍यांनी तिच्‍याशी छेडछाड केली. नंतर तिला धमकावून झुडुपांमध्‍ये नेत नराधमांनी तिच्‍यावर गँगरेप केला. तब्‍बल 3 तास हा प्रकार चालला.
- गँगरेपनंतर आरोपींना पिडीतेची हत्‍या करायची होती, मात्र कसेतरी करुन तिने तेथून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- घटनेनंतर प्रचंड घाबरलेली मुलगी ताबडतोब धावत हबीबगंज रेल्‍वेस्‍टेशनजवळील सरकारी क्‍वार्टरमध्‍ये आपल्‍या घरी पोहोचली. काही वेळानंतर धक्‍क्‍यातून सावरल्‍यानंतर आपल्‍या पालकांना तिने घटनेची माहिती दिली. पिडीतेचे वडील रेल्‍वे पोलिसमध्‍ये सब इंस्‍पेक्‍टर आहेत. 

पोलिसांची असंवेदनशिलता, कुटुंबाला मारायला लावल्‍या चकरा 
- घटनेनंतर पोलिसांच्‍या असंवेदनशीलतेचा चेहराही समोर आला आहे. पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार देण्‍यासाठी गेलेल्‍या पिडीतेच्‍या कुटुंबाला पोलिसांनी तब्‍बल 1 तास वेगवेगळ्या स्‍टेशनच्‍या चकरा मारायला लावल्‍या.
-  प्रथम भोपाळ पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेलेल्‍या या कुटुंबाला तेथील पोलिसांनी हे प्रकरण आमच्‍या हद्दीत येत नाही म्‍हणत तेथून जायला सांगितले. यांनतर हे कुटुंब जवळभर तासभर एमपी नगर पोलिस स्‍टेशन आणि हबीबगंज पोलिस स्‍टेशनच्‍या चकरा मारत होते. यानंतर त्‍यांना सांगण्‍यात आले की, हे प्रकरण जीआरपी स्‍टेशन अंतर्गत येते. अखेर जीआरपी स्‍टेशनमध्‍ये पिडीतेची वैद्कीय तपासणी करुन आरोपींविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. वैद्कीय तपासणीमध्‍ये पिडीतेवर बलात्‍कार झाला असल्‍याचे सिद्ध झाले. 
- यांनतर जीआरपी पोलिसांनी गुरुवारी 4 आरोपींना अटक केली. गोलू बिहारी, राजेश, रमेश, अमर अशी आरोपींची नावे आहेत. 
 
केवळ एका ASIला केले निलंबित 
- गुन्‍हा दाखल करुन घेण्‍यास हलगर्जीपणा केल्‍याबद्दल एमपीनगर पोलिस स्‍टेशनच्‍या ASIला निलंबित करण्‍यात आले आहे. 
- बुधवारी सकाळी 11 वाजता पिडीतेचे कुटुंब या स्‍टेशनमध्‍ये आले होते तेव्‍हा त्‍यांची भेट ASI आर.एन. टेकाम यांच्‍याशी झाली होती. 
-  ASI आर.एन. टेकाम यांनी कुटुंबाला हे प्रकरण हबीबगंज पोलिसस्‍टेशनच्‍या हद्दीत येत असल्‍याचे सांगून त्‍यांना तेथे जाण्‍यास सांगितले. मात्र कायद्यानुसार त्‍यांना आपल्‍या स्‍टेशनमध्‍येही गुन्‍हा दाखल करता आला असता. नंतर ती केस डायरी ते हबीबगंज पोलिस स्टेशनला देऊ शकले असते. 
- डीआयजी संतोष कुमार सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कर्तव्‍यात कसूर केल्‍याबद्दल ASI आर.एन. टेकाम यांना निलंबित केले आहे. 

पिडीतेने इशारा करताच वडीलांनी आरोपीला पकडले 
- एमपीनगरहून हबीबगंज ठाण्‍यात जात असताना पिडीतेचे कुटुंब काही वेळ एका कॉम्‍प्लेक्‍स जवळ थांबले होते. 
- तेवढ्यात तेथे एका झोपडीत राहणा-या गोलू नावाच्‍या आरोपीवर पिडीतेची नजर गेली. तिने तेव्‍हाच ओरडून ही बाब आपल्‍या वडीलांना सांगितली. त्‍यांनतर आई-वडीलांनी मिळून आरोपीला पकडले व त्‍याला हबीबगंज पोलिस स्‍टेशनमधे घेऊन गेले. पोलिसांना सर्व माहिती सांगितल्‍यावर पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरु केली. त्‍यानंतर काही वेळातच पोलिसांनी इतर आरोपींना पकडून आणले. 
- त्‍यानंतर हबीबगंज पोलिस स्‍टेशनचे अधिकारी घटनास्‍थळी गेले. ते‍थे त्‍यांना पिडीतेचा मोबाईल आणि कानाचे झुमके मिळाले. नंतर जीआरपी पोलिसांनाही त्‍यांनी बोलावून घेतले. 
 
खटला फास्‍ट ट्रॅक कोर्टात चालवू- मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान 
- मुख्‍यमंत्री शिवरजा सिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून हा खटला फास्‍ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्‍याचे सांगितले आहे. 
- मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले की, '4 आरोपींना पकडण्‍यात आले आहे. दोषींना निश्चित शिक्षा दिली जाईल. कर्तव्‍यात कसूर करणा-या एका पोलिस अधिका-यालाही निलंबित करण्‍यात आले आहे. जे जे दोषी आढळतील त्‍यांच्‍याविरोधात कारवाई केली जाईल.'  
 
 
बातम्या आणखी आहेत...