आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयएएस अधिकार्‍याने कोर्टात फोटो काढला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरात उच्च न्यायालयात आयएएस अधिकारी जयंती रवी यांनी मंगळवारी याचिकाकर्त्याच्या सहायकाचा फोटो काढला. सुनावणीवेळी हा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच न्यायमूर्तींनी रवी यांना फटकारले; परंतु त्यानंतरही सदर महिला अधिकारी तेथेच मान खाली घालून बसून राहिल्या. त्यावर सरकारी वकिलाने विनाशर्त माफी मागून फोटो डिलीट केला.

जयंती रवी या गुजरातच्या उच्चशिक्षण तंत्रज्ञान आयुक्त आहेत. अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात गुजरात सरकारने पर्संेटाइल पद्धती लागू केली आहे. त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्ती भास्कर भट्टाचार्य व जे. बी. पारडीवाला यांच्या पीठाने त्यांना या कृतीबद्दल फटकारले. सुनावणी सुरू असताना रवी यांनी आपल्या मोबाइलच्या साह्याने खटल्यात याचिकाकर्त्याला मदत करणार्‍या स्टॅटिक्स तज्ज्ञाचा फोटो काढला होता. ही बाब याचिकाकर्त्याने तत्काळ लक्षात आणून दिली. हा गंभीर गुन्हा आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का, अशा शब्दांत कोर्टाने त्यांना सुनावले.

(फाईल फोटो : गुजरात हायकोर्ट )