आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना पंतप्रधानपदावर पाहण्याची इच्छा : नागार्जुन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - देशभरात नरेंद्र मोदींची लाट असतानाच दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुन यांनीही सोमवारी आपली इच्छा व्यक्त केली. मोदींना पंतप्रधानपदावर पाहण्याची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी मोदींची भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

नागार्जुनने मोदींचे तोंडभरून कौतुक केले, परंतु आपल्या भेटीला राजकीय चष्म्यातून पाहिले जाऊ नये. त्या अगोदर तेलुगू स्टार पवन कल्याण यांनीही मोदी यांची भेट घेतली होती. आमचे कुटुंब 70 वर्षांपासून चित्रपट उद्योगात आहे. राजकारणात जाण्याचा विचार केलेला नाही. भाजपमध्ये सामील होणे किंवा पत्नीसाठी तिकीट मागण्याच्या अटकळी बिनबुडाच्या आहेत. मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, असे नागार्जुन म्हणाला.