इंदूर- यावर्षी मध्य प्रदेशातील इंदूर येथे चातुर्मासानिमित्त आलेल्या जैन संतांचा पूर्वेतिहास जाणून घेतल्यास आश्चर्य वाटते. आचार्य विजय कीर्तियश सुरिश्वर महाराजांच्या शिष्यांत कोणी सीए, अभियंते, तर कोणी प्राध्यापक, अब्जाधीश व्यापाऱ्याच्या एकुलता एक मुलाचा समावेश आहे.
या सर्वांनी प्रपंचाचा त्याग करून वैराग्य स्वीकारले आहे. आचार्यश्री यांच्यासोबत आलेल्या १०० साधू-संतांमध्ये ५० टक्के उच्चशिक्षित आणि संपन्न कुटुंबांतील आहेत. सर्वांनी एका क्षणात ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून धर्माच्या कार्यास वाहून घेतले आहे.
३० वर्षांचे तरुण दीक्षार्थी सुद्धा
आचार्य विजय कीर्तियश यांच्या सान्निध्यात ३० तरुण (मुमुक्षु) इंदूरहून आलेले आहेत. ते जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. यामध्ये कोणी पदवीधारक, तर कोणी उद्योगपतीही आहेत, तर कोणी मोठ्या कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून वैराग्याच्या मार्गावर वाटचाल सुरू केली.