आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आखाड्याची मागणी फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - नाशिक कुंभमेळ्यात नव्या आखाड्याची मान्यता आणि स्नानावरून साधू-साध्वीमध्ये संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आखाडा परिषदेने महिला साधूंसाठी स्वतंत्र आखाड्याची मागणी फेटाळली आहे. परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, नव्या आखाड्याला मान्यता देण्याची कोणतीही तरतूद नाही. आद्य शंकराचार्यांनी सुरू केलेल्या परंपरेत बदल केला जाणार नाही. दुसरीकडे, महिलांसाठी स्वतंत्र आखाड्याची मागणी करणाऱ्या साध्वी त्रिकाल भवंता सरस्वती यांनी महिला आखाडा स्थापन केल्याचे सांगितले. नाशिक कुंभमेळ्यात प्रशासनाने त्यांना जागाही दिली आहे.

महंत गिरी म्हणाले, नवीन आखाडा कोणत्याही स्थितीत होणार नाही. धर्म मान्यतेनुसार सध्या १३ आखाडे आहेत. साध्वींनी नैनीत एक मंदिर स्थापन केले आहे. त्यांनी साध्वीची दीक्षाही घेतली नाही. दीक्षा घेतल्याशिवाय कोणी आखाड्यात सहभागी होऊ शकत नाही, त्यामुळे कोणी नवीन आखाडा कसा निर्माण करेल. नव्या महिला आखाड्याला काहीच महत्त्व नाही. समाजात केवळ गैरसमज पसरवला जात आहे. आखाड्यात महिला साध्वींची परंपरा खूप आधीपासून आहे. जुन्या आखाड्यात महिला संन्याशांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

महिला आखाड्याला जागा मिळाली
महिला आखाड्याच्या संस्थापक त्रिकाल भवंता यांच्या म्हणण्यानुसार आपण आखाडा परिषदेकडून मान्यता मागत नाही. त्यांनी मान्यता द्यावी की न द्यावी,त्याचा काहीच फरक पडत नाही. प्रशासन सर्व आखाड्यांना सुविधा देते. आम्ही नाशिक प्रशासनाकडे जागेची मागणी केली आहे. अन्य संन्यासिनींसोबत आपण नाशिकमध्ये असून कुंभ स्नानाची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...