आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वेळा रेप, 50 वेळा फिजिकल रिलेशन, केवळ एका माफीने झाला \'समझौता\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- लग्नाचे आमिष दाखवून माजी आमदारचा मुलगा विजय राठोडने ऊना येथील तरुणीशी 50 पेक्षा जास्त वेळा शारीरिक संबंध ठेवले. यापैकी 14 वेळा त्याने बळजबरी केली. तरुणीला दारु पाजून तिच्यावर रेप केला. पण त्यानंतर मात्र त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पण काल अचानक विजय आणि त्याचे वडील महिला क्राईम ब्रांचमध्ये आले. तरुणीचे कुटुंबीय तेथेच उपस्थित होते. यावेळी बाप-लेकांनी हात जोडून माफी मागितली. आणि तरुणीने विजयला माफ केले.
युवतीने केले होते हे आरोप
विजयने 50 पेक्षा जास्त वेळा फिजिकल रिलेशन ठेवले, असा आरोप 25 वर्षीय तरुणीने ठेवला होता. 14 वेळा तर त्याने चक्क रेप केला. यावेळी विरोध केला असताना त्याने धमकी दिली, की तू माझी झाली नाहीस तर कुणाचीही होऊ शकत नाहीस. तू जर मला सुख दिले नाही तर मी संपूर्ण जगाला नष्ट करुन टाकीन.
वाढदिवशी तयार केला व्हिडिओ
तरुणीने सांगितले, की वाढदिवशी त्याने मला घरी बोलवले होते. त्यासाठी धमकी दिली होती. मी आले नाही तर सर्वांना रिलेशनशिपची माहिती देईल असे म्हटले होते. त्या दिवशी त्याचे मित्रही वाढदिवसाला येणार होते. पण मी गेल्यावर तेथे कुणीच नव्हते. केवळ तो होता. त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. याचा व्हिडिओ तयार केला. जर तू मी बोलवल्यावर आली नाही तर तुझ्या वडीलांना हा व्हिडिओ पाठवेल किंवा युट्यूबवर टाकेल अशी धमकी दिली.
अशी झाली ओळख
ऊनाच्या तरुणीने सांगितले, की या शहरात माझ्या वडीलांची खुप ओळख आहे. मी अनेक कार्यक्रमांमध्ये जात असते. एका कार्यक्रमात त्याने मला बघितले. त्यानंतर फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर चॅटिंग सुरु केले. माझा मोबाईल क्रमांक मिळवला. माझ्याशी हॉट्सअॅपवर वारंवार चॅटिंग करायचा. या दरम्यान तो माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने एकदा मला एका ठिकाणी भेटायला बोलवले. माझ्यावर रेप केला. पण नंतर लग्न करेल असे आश्वासन दिले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा या घटनेशी संबंधित फोटो... विजयच्या वडीलांनीही मागितली माफी... असा झाला समझौता...
बातम्या आणखी आहेत...