आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोरबंदर नौदल तळावर स्फोटाचा मोठा आवाज; पोलिस घटनास्थळी दाखल, नौदलाने वृत्त फेटाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरबंदर- गुजरातमधील पोरबंदर येथील नौदलाच्या तळावर शुुक्रवारी स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. स्फोटाच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुसरीकडे, नौदलाच्या सूत्रांनी स्फोटाचे वृत्त फेटाळले आहे. फटाक्यांचा आवाज असल्याचे नौदलाने हा स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने गेल्या आठवडयात पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. भारतीय जवानांंनी दहशतवाद्यांची सात तळेे उद्ध्वस्त करून 38 दहशतवाद्यांचा खातमा केला होती. यानंतर भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूूमीवर तिन्ही सैन्य दलांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाब, जम्मू-काश्मिर सीमेजवळची गावे रिकामी करण्यात आली आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये सर्तकतेचा इशारा...
बातम्या आणखी आहेत...