आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोकसभेत जाऊन डॉक्टर सांगणार नेत्रदानाची महती, अहमदाबादेतील रुग्णालयाचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये अहमदाबाद येथील डॉक्टरांनी अंधत्व निवारणासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत डॉक्टर शोकसभा तसेच अंत्यवधिीमध्ये सहभागी होऊन लोकांना नेत्रदानाची गरज सांगून त्यांना त्यासाठी सहकार्याचे आवाहन करणार आहेत. दृष्टदिोष तसेच अंधत्वामुळे त्रस्त असलेल्या लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण आणण्याच्या उद्देशाने ही माेहीम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी शासकीय नेत्र रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे.
शोकसभा, उठावना, अंत्यवधिी तसेच विवाह व इतर मंगल कार्यात सहभागी होऊन डॉक्टर नेत्रदान अभियान जागृती करणार आहेत. अहमदाबाद येथील नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक मेहता यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की नेत्रदानासाठी २५ ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत नेत्रदानासंदर्भात समाजजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यात डॉक्टरांनी सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होऊन जनजागृती केली.

सामाजिक जागृतीसाठी प्रयोग
लोक आपल्या नातेवाइकांच्या िनधनानंतर शोकसभा किंवा उठावना कार्यक्रम आयोजित करतात. त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. नुकत्याच एका उठावना कार्यक्रमात ८० लोकांनी नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून दिले. एखाद्या इच्छुक कुटुंबाने नेत्रदान जागृतीसाठी बोलावले तर तेथेही तीन डॉक्टरांचे पथक पाठवले जाणार आहे. हे डॉक्टर नेत्रदान प्रक्रिया, त्याची गरज व त्या अनुषंगाने इतर माहिती उपस्थितांना सांगतील.