आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहाँ प्रकरण : एन. के. अमीन यांचा जामीन अर्ज फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - इशरत जहाँ बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एन. के. अमीन यांचा जामीन अर्ज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय)विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.

या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अमीन यांचे नाव आहे. त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज आज (मंगळवार) विशेष सीबीआय न्यायालयाचे अतिरिक्त सरन्यायाधीश एस. एच. खुटवड यांनी फेटाळला आहे.

इशरत जहाँ बनावट एन्काउंटर प्रकरणी अमीन यांना 2004 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण असल्याचा आरोप करत अमीन यांनी 4 जुलै रोजी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा आरोप फेटाळत न्यायालयने सीबीआयने वेळेत आरोपपत्र दाखल केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अहवालानुसार बनावट एन्काउंटच्या यादीत गुजरातचे नाव खालच्या क्रमांकावर आहे.