आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father In Law And Mother In Law Married Their Daughter In Law

VIDEO: असा घडवला आदर्श, जामनगरच्या सासू सासऱ्यांनी विधवा सुनेचे लावून दिले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- जामनगरमधील वृद्ध दांपत्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याचे लग्न झाले होते. त्याला एक लहान मुलगाही होता. मुलाच्या मृत्यूनंतर सुनबाई आणि नातू सासरी राहत होते. पण सासू सासऱ्यांना सुनबाईच्या भावी आयुष्याची चिंता होती. त्यांनी सुनबाईचे सुयोग्य मुलाशी लग्न लावून दिले. एवढेच नव्हे तर कन्यादानही केले.
देवकीबाई सांगाणे असे आदर्श सासऱ्यांचे तर लाडूबाई सांगाणे असे आदर्श सासूचे नाव आहे. त्यांच्या सूनेचे नाव गौरी आहे. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न जामनगरचे मोहन सांगाणे यांच्यासोबत थाटामाटात झाले होते. पण मोहनचा गेल्या वर्षी हार्टअटॅकने मृत्यू झाला. गौरी अगदी तारुण्यात विधवा झाली. मोहनला शुभम नावाचा मुलगाही आहे. यानंतर गौरी सासरी राहत होती. पण सांगाणे यांना तिच्या भावी आयुष्याची चिंता लागून होती. त्यांनी तिला समजवत अखेर लग्नासाठी तयार केले. तिच्यासाठी सुयोग्य जोडीदाराची निवड केली.
आज गौरीचे लग्न जयेश पानेलीया यांच्यासोबत झाले. यावेळी तिच्या सासू सासऱ्यांनी कन्यादान केले. आज ते खऱ्या अर्थाने गौरीचे आईवडील झाले.
पुढील स्लाईडवर बघा, या लग्नाचे फोटो... सासू सासऱ्यांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श... बघा सासू सासऱ्यांचा फोटो...