राजुला (गुजरात)- शनिवारी गुजरातमधील अमेरिली जिल्ह्यातील मजादर गावात सिंहिण घुसल्याने खुप गोंधळ उडाला. यानंतर गावकरी अगदी सौरावैरा धावताना दिसून येत होते.
गावात सिंहिण घुसल्याचे समजल्यावर लोकांनी घराची दावे बंद करुन घेतली. त्यानंतर तब्बल पाच तास गावात कुणाचेही घर उघडे नव्हते. रस्त्यांवर शुकशुकाट होता. नागरिक घरातच बसून राहिले. काही उत्साही नागरिक घराच्या गच्चीवर जाऊन सिंहिणीची हालचाल टिपत होते. या सिंहिणीने तब्बल सहा लोकांना जखमी केले. वन विभागाने सिंहिणीला बेशुद्ध केल्यावर गावातील भीतीचे वातावरण निवळले.
यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही सिंहिण सुमारे दोन वर्ष वयाची आहे. समुहापासून वेगळी झाल्याने ती रागात होती. त्यामुळे तिने गावकऱ्यांवर हल्ला केला. येथील ननाभाई वाघ सिंहिणीच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या पायाचा सिंहिणीने चावा घेतला.
पुढील स्लाईडवर बघा, गावात सिंहिण घुसल्याने कसे पसरले भीतीचे वातावरण....