आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटीदार आंदोलन आता रुपेरी पडद्यावर, पोस्टरवर अस्सल डायलॉगबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये झालेले पाटीदारांचे आंदोलन सर्वांच्या स्मरणात आहे. २०१५ मध्ये आंदोलनाची देशभरात चर्चा होती. पाटीदारांच्या या शक्तिप्रदर्शनाला लवकरच रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ‘पॉवर ऑफ पाटीदार’ असे चित्रपटाचे शीर्षक आहे. हा चित्रपट गुजरातीमधून प्रदर्शित होणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
चित्रपटात हार्दिकची भूमिका अभिनेता संजय देव यांनी केली आहे. त्यांची आेळख बॉबी अशीही आहे. बॉबी यांनी ४० हून अधिक गुजराती चित्रपटांतून अभिनय केला आहे. चित्रपटाचे एकूण बजेट एक कोटी रुपये आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश पटेल यांनी केले आहे. आम्ही संपूर्ण आंदोलन आणि त्यांची व्याप्ती जवळून पाहिली आहे, असे निर्माते दीपक सोनी यांनी सांगितले. पाटीदार आंदोलनाने राज्य सरकार आणि सरकारी यंत्रणेला हादरून टाकले होते. म्हणूनच या विषयावर आधारित चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट तयार करण्यासाठी पाटीदार अनामत आंदोलन समिती (पीएएएस) यांच्याकडून आम्ही परवानगी घेतली होती, अशी माहिती महेश पटेल यांनी दिली. आता लवकरच राज्य सरकार आणि पोलिसांकडूनही आवश्यक परवानगी घेतली जाईल. दुसरीकडे गुजरातमध्ये चित्रपटाचे पोस्टर झळकू लागले आहेत. त्यावर स्लोगन आहे -‘भीख नही मांगू छु, पाटीदार छु, तकलीफ तो रहेवानी’(अर्थात भीक मागत नाही, पाटीदार आहे, त्रास तर होणारच). चित्रपटाची नोंदणी वेस्टर्न इंडियन प्रोड्युसर असोसिएशनमध्ये करण्यात आली आहे. केसर भवानी या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जात आहे.

दिग्दर्शक महेश पटेल स्वत:देखील पाटीदार आहेत. ते म्हणाले, देश-विदेशातील अनेक आंदोलनांवर चित्रपट तयार झाले आहेत. त्यापैकी अनेक चित्रपटांनी आपली अमिट छाप ठेवली आहे. या आंदोलनामुळे हार्दिकची सर्वत्र चर्चा झाली. देश-विदेशातील मीडियातूनही आंदोलनाचे मथळे झळकले. म्हणूनच हा चित्रपट लोक पसंत करतील, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.