आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire In Chemical And Oil Godown Near Daxeshwar Temple Surat

सुरतमध्ये केमिकल-ऑइल गोदामाला लागली भीषण आग; \'ब्रिगेड कॉल\'ची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भीषण आगीमुळे सर्वत्र चळबळ उडाली आहे.)

सुरत- पांडेसरा भागातील एका केमिकल अॅण्ड ऑइल गोदामाला भीषण आग लागली आहे. आग झपाट्याने पसरत आहे. यामुळे फायर ब्रिगेडने 'ब्रिगेड कॉल' घोषित केला आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.पाणी आणि फोमचा मारा केला जात आहे.
मिळालेली माहिती अशी की, पांडेसरा भागातील दक्षेश्वर मंदिराजवळ असलेल्या केमिकल अॅण्ड ऑयल गोदामाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवळपास 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

संपूर्ण परिसर केला रिकामा
आग झपाट्याने पसरत असल्यामुळे केमिकल गोदाम परिसर रिकामा करण्यात आला. केमिकल गोदामाजवळ एक एम्ब्रॉयडरीचा कारखाना आहे. कारखाना परिसरात केमिकलचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे 40 ते 50 फायटर कारखान्यातील सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढण्याचे काम करत आहे.

घटनास्थळाची छायाचित्रे पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...(सभी छायाचित्रे: दिव्यभास्कर)