(फोटो: शहरातील सरखेज पोलिस ठाण्यात लागलेली भीषण आग)
अहमदाबाद- शहरातील सरखेज पोलिस ठाण्याला सोमवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली. ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात आलेले 144 वाहने या आगीत जळून खाक झाले.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. परंतु, पोलिसांनी जप्त केलेले 144 वाहने पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. यात दोन कार, एक ऑटो रिक्षा आणि एक ट्रकचा समावेश आहे. लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सात बंबांच्या मदतीने आग विझवली. आग कशी लागली, याचा पोलिस शोध घेत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सरखेज पोलिस ठाण्यात लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारा व्हिडिओ आणि फोटो...