आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Duplicates Of Narendra Modi In India, Divya Marathi

मोदींसारख्या दिसणारी पाच व्यक्ती, ज्यांनी व्यापला Media Coverage

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी भारतीय राजकारणाच्या चर्चेत मध्‍यवर्ती स्थानी आहेत. तसेच त्यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा व्यक्तीही चर्चेचा विषय बनला आहे. ती व्यक्ती नुकतेच बडोदामध्‍ये आली होती. मुळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेले अभिनंदन पाठक यांचा चेहरा हुबेहुब मोदींसारखा दिसतो. या कारणामुळे ते कुठेही गेली, लोकांची नजर त्यांच्यावरच राहते. पाठक हे नरेंद्र मोदींचे प्रशंक आहेत. या सर्व गोष्‍टींमुळे भाजपच्या निवडणुकीच्या मुख्‍य प्रचारकाची भूमिका ते बजावत आहेत. ते देशभर मोदींचा प्रचार करित आहेत.

तुम्हाला आश्‍चर्य वाटेल फक्त पाठक यांचाच चेहरा मोदींसारखा दिसतो असे नाही, तर मोदींसारखा चेहरा दिसणारी इतरही पाच व्यक्ती आहेत आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांनी देशात चालू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मोसमात स्वत:ला मोदींच्या रंगरूपात बदलून घेतले आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा मोदींसारखे हुबेहुब दिसणा-या व्यक्तींची छायाचित्रे.....