गांधीधामः ड्रायव्हरच्या चुकीमुळे सोमवारी रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रेलरला एक कारने धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की, यामध्ये तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जणांचा मृत्यू रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला. दिल्लीत एका विवाह सोहळ्यास गेलेले अंजारचे व्यास कुटुंबिय तेथून परतताना राजस्थानच्या श्रीनाथजी भगवान यांच्या दर्शनास गेले. दर्शन घेऊन घराकडे येत असताना सामखियालीजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात व्यास कुटुंबाचे प्रमुख आणि त्यांची पत्नी, मुगला, मुलगी आणि ड्रायव्हर अशा सर्वांचाच मृत्यू झाला.
हे कुटुंब अंजारकडे दुपारी 3 च्या सुमारास रवाना झाले तेव्हा कच्छचे प्रवेशव्दार असलेले सामखियाणा येथे पोहोचले. ओव्हर ब्रीजवरून जाण्याआगोदर ड्रायव्हर राजेश चुडासमा यांना बंद पडलेले ट्रेलर दिसले नाही, त्यामुळे त्यांची कार अत्यंत वेगाने ट्रेलरला धडकली. अपघात होताच कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. मृत डॉक्टर राजेश (वय 40), ड्राइवरच्या बाजूला बसलेले मेहूल भाई (वय 45) तसेच वरदा बेन यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर अपघातात गंभीर जखमी झालेले किशन आणि कविता यांचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.
पुढील स्लाईडवर पाहा, या अपघातानंतरची सर्व छायाचित्रे...
(फोटो - दिव्य भास्कर)