आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Squad In Search Of Narayan Sai, Suspect To Go In Nepal

पोलिसांची सहा पथके नारायण साईच्या शोधात, बिहारमार्गे नेपाळला पलायनाचा संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत / अहमदाबाद - अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला पकडण्यात यश आलेले नाही. गुजरात पोलिसांची सहा पथके त्यांच्या मागावर आहेत. दुसरीकडे ते बिहारमार्गे काठमांडूला जाण्याची शक्यता वर्तवली जाते.


साईं यांचा तपास करण्यात येत आहे. सुरतचे चार व अहमदाबाद पोलिसांची दोन पथके त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना सुरतच्या दहा विशेष साधकांचाही शोध आहे. त्यात हनुमान गंगा, जमुना व इतर सात जणांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अहमदाबाद पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली असून त्याद्वारे तपासाचे काम सुरू आहे. नारायण साई व आसाराम यांच्यावर सुरतच्या दोन बहिणींनी आरोप केला होता. सुरतमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या विनंतीनंतर गांधीनगर न्यायालयाने आसाराम यांच्या विरोधात वॉरंट जारी केले. आसाराम सध्या जोधपूर केंद्रीय तुरुंगात आहेत.


तिसरी बहीण आश्रमात
नारायण साई व आसाराम यांच्या विरोधात अत्याचाराचा आरोप करणा-या दोन बहिणींची तिसरी बहीण आसाराम यांच्या आश्रमात आहे. तिने आश्रमातून घरी जाण्यास नकार दिला आहे. तिचे वय 27 ते 28 दरम्यान आहे.


स्थगितीस नकार
आसाराम प्रकरणात प्रसारमाध्यमातून निवाड्याची भूमिका दिसून येत आहे. अशा प्रकारचे मीडिया ट्रायल रोखण्यात यावे, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सर्वाेच्च् न्यायालयाने मीडिया ट्रायल रोखण्याची मागणी मंगळवारी फेटाळून लावली. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.