सुरेंद्र नगर- गुजरातमधील सुरेंद्र नगर जिल्ह्यात ऋषि पंचमीनिमित्त नर्मदा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका कुटूंबातील पाच महिलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना धोलीधजा धरणावर घडली. मृतांमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. धोलीधजा धरण नर्मदा नदीवर आहे. नदीला पूर आल्याने धरणात भरपूर पाणी आहे.
ऋषि पंचमीला पवित्र नर्मदा नदीवर स्नान करण्याची धार्मिक परंपरा आहे. या परंपरेनुसार सुरेंद्रनगरमधील मफलियापरा येथील पाच हनुमान चौकातील एका कुटूंबातील नऊ महिला धरणावर स्नान करण्यासाठी आल्या होत्या. मात्र सगळ्या महिलांचा पाय घसरुन पाण्यात पडल्या. पाणी खोल असल्याने त्या बुडू लागल्या नऊपैकी चार महिलांना वाचवण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पाच महिलांचा बुडून मृत्यू झाला. पाचही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
शांतीबेन शंकरभाई, सोनलबेन शंकरभाई (19), पूजा बाबुभाई (17), आरती प्रविणभाई (17) व
लक्ष्मी भरतभाई (25) अशी मृतांची नावे आहेत.
पुढील स्लाइसवर पाहा, ह्रदय हेलावणारी छायाचित्रे..