आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गुजरातमध्ये पूरस्थिती, झाडे कोसळली, अनेक ठिकाणी वाहने अडकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - सतत दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मान्सूनच्या धारांमुळे गुजरातमधील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. तर अनेक ठिकाणी पूल, रेल्वेचे रूळ वाहून जाणे असे प्रकारही घडले आहेत. सौराष्ट्रमधील स्थितीही अत्यंत बिकट असून आपत्ती व्यवस्थापणाचे काम वेगाने सुरू आहे. अहमदाबाद, राजकोट, सूरतमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी इमारती, घरे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पावसामुळे गुजरातमध्ये निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा आपण काही फोटोंच्या माध्यमातून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा गुजरातमधील पावसानंतरचे ठरावीक PHOTOS
बातम्या आणखी आहेत...