आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL PHOTOS: गुजरातच्या मोरबी शहरात दिसला उडणारा साप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरबी (गुजरात) - सोशल मीडियावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याने त्याने ठरवाये आहे. मात्र सोमवारी सोशल नेटवर्किंग साइट्सवर उडणाऱ्या सापाचा फोटो व्हायरल झाला, आणि हा चर्चेचा विषय झाला आहे. हा फोटो कुठला आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. तरी, मोरबी येथील काही युवकांचे म्हणणे आहे, की हा फोटो त्यांनी टिपला असून खरोखर साप हवेत उडत होता. आता, हा फोटो आम्हीच कॅमेऱ्यात कैद केला असे म्हणणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्याचबरोबर संपूर्ण गुजरातमध्ये हा फोटो व्हायरल झाला आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर काहींचा दावा आहे, की साप खरोखर उडत होता, तर काही म्हणाले, एखादा पक्षी त्याला घेऊन उडत असेल आणि त्याच्या तावडीतून सुटल्यामुळे साप हवेत उडत असल्याचे दिसत असावे. तर काहींनी हा बनावट फोटो असल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...