आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बडोद्यातील अनोखे रेस्तराँ, फूड सर्व्ह करण्यासाठी धावते ट्रेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात) - शहरात एक अनोखे रेस्त्तराँ सुरु झाले आहे. येथे पाहुण्यांना भोजन वेढण्यासाठी वेटर नाही तर एक छोटेखानी ट्रेन हे काम करते. हॉटेलमध्ये मॉडल रेल्वे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे येथे भोजनाच्या आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्यांना आपण रेल्वे स्टेशनवर बसल्याचा आभास होतो. येथे वेटर फक्त ऑर्डर घेण्याचे काम करतात. त्यानंतर फूड सर्व्हिसची जबाबदारी रेल्वेची असते. या अनोख्या कल्पनेमुळे थोड्या कालावधीतच या हॉटेलचा शहरात बोलबाला झाला असून लोक गर्दी करु लागले आहेत.
लॅपटॉपने ऑपरेट होते ट्रेन
फूड सर्व्हिस करणारी ट्रेन एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लॅपटॉपला जोडलेली आहे. लॅपटॉपवरुन एक व्यक्ती तिला ऑपरेट करत असतो. ऑर्डर घेणारा वेटर ट्रेन ऑपरेटर आणि किचनमध्ये मॅसेज पोहोचवतो. त्यानंतर ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर वेटर सर्व खाद्य पदार्थ ट्रेनवर ठेवून देतो आणि ते घेऊन जाण्याचे काम ट्रेनद्वारे केले जाते. ऑर्डर पोहोचवल्यानंतर हॉटेलमध्ये फिरत ट्रेन परत किचनमध्ये येते. एवढेच नाही तर, ट्रेन चालत असतानी खऱ्या रेल्वे प्रमाणेच शिटी आणि रेल्वे चालण्याचा आवाज येतो. हा रेस्तराँमध्ये येणाऱ्या लोकांसाठी वेगळा अनुभव असतो.
अमेरिकेतील रेस्तराँमध्ये पाहिली होती सर्व्हिंग ट्रेन
मनीष पटेल यांनी राजकोटमध्ये एमबीए केल्यानंतर 12 वर्षे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. या दरम्यान त्यांनी अमेरिकेतील एका रेस्तराँमध्ये ही सर्व्हिंग ट्रेन पाहिली आणि त्यांना ती खूप आवडली. त्यांनी त्या हॉटेलमधील प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली आणि तसेच रेस्तराँ बडोद्यात सुरु करण्याचे ठरवले. लहान भाऊ निरवला सोबत घेऊन मनिष यांनी कल्पना सत्यात उतरवली. निरवलाही खासगी कंपनीतील नोकरी सोडण्यास सांगितले. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी मित्र धवल याला देखील सहभागी करुन घेतले. सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर तिघेही यशस्वी झाले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी सर्व्ह करते ट्रेन
बातम्या आणखी आहेत...