आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former ADG Pp Pandey Also Gets Bail, Court Orders Vanjara To Not Enter In Gujarat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र मोदींवर \'बळीचा बकरा\' केल्याचा आरोप करणारे वंजारा यांना मिळाला सशर्त जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- अहमदाबादच्या विशेष कोर्टाने इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी गुजरातचे निलंबित अतिरिक्त पोलिस महासंचालक पी.पी.पांडे यांना जामीन मंजूर केला. तसेच माजी आयपीएस अधिकारी जीडी वंजारा यांना गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. दोन्ही पो‍लिस अधिकारी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात होते.

वंजारा यांनी 2013 मध्ये डीआयजी पदाचा राजीनामा देत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर 'बळीचा बकरा' केल्याचा आरोप केला होता.

पी.पी.पांडे यांना 50 हजार रुपयांच्या दोन वैयक्तिक जातमुचलक्यांवर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने पांडे यांचा व्हिसा देखील जप्त केला आहे. 15 जून 2004 ला अहमदाबादमधील बाहरी भागात 19 वर्षीय इशरत जहॉं हिच्यासह तिचे तीन मित्र जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्लई, अमजद अली राणा आणि जीशान जौहर याचे बनावट एन्काऊंटर करण्यात आले होते. त्यावेळी पांडे हे अहमदाबादमधील पोलिस सहआयुक्त (गुन्हे शाखा) होते.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. वंजारा यांना गुजरातमध्‍ये प्रवेश करण्यास बंदी घालण्‍यात आली आहे. तसेच आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी वंजारा यांना कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे.

तसेच 2005 मध्ये सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर-बी आणि तुललीराम प्रजापती आंध्र प्रदेशात एका बसमध्ये प्रवास करत होते. तेव्हा गुजरात पोलिसांनी तिघांचे अपहरण केले. काही दिवसांनी सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बीची हत्या करण्‍यात झाली होती. या घटनेचा एकमेव साक्षीदार असलेला तुलसीराम प्रजापतीची एक वर्षानंतर पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केली होती. प्रजापती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, असे स्पष्टीकरण गुजरात पोलिसांनी दिले होते.

दरम्यान, डिसेंबर 2014 मध्ये मुंबईतील एका कोर्टाने अमित शहा यांना याप्रकरणी क्लिनचिट दिली होती.