आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Railway Minister Of Gujarat Refused To DNA Match

लैंगिक शोषणप्रकरणी कॉंग्रेसचे नेते नारण राठवा अडचणीत, \'डीएनए\'स स्पष्ट नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- लैंगिक शोषणप्रकरणी कॉंग्रेसचे नेते आणि माजी रेल्वे राज्यमंत्री नारण राठवा अडचणीत सापडले आहेत. डीएनए चाचणीस राठवा यांनी स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत राठवा यांनी गुजरात हायकोर्टात शपथपत्र दाखल केले आहे.

आपल्यावरील सगळे आरोप हे राजकीय प्रेरीत असून ब्‍लॅकमेल करण्याच्या उद्देशाने ते करण्‍यात असल्याचे राठवा यांनी म्हटले आहे. दरम्यान, नारण राठवा हे आपल्या दोन्ही मुलांचे वडील असल्याचा दावा सौराष्ट्रमधील अमरेली येथील एका महिलेने केला आहे.

राठवा यांनी फेटाळला आरोप...
संबंधित महिलेने केलेले सगळे आरोप नारण राठवा यांनी फेटाळले आहेत. राठवा यांनी गुजरात हायकोर्टात शपथपत्र दाखल करून डीएनए चाचणीस स्पष्ट नकार दिला आहे. महिलेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे राठवा यांनी दावा केला आहे.

संबंधित महिला विवाहीत असून ती सासू-सासर्‍यांचा मानसिक छळ करत असल्याचे राठवा यांनी कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी चार सप्टेंबरला होणार आहे.

पीडितेने सादर केले दस्‍ताऐवज...
महिलेने पुरावा म्हणून पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि मतदान कार्डसह अनेक दस्ताऐवज कोर्टात सादर केले आहेत. यात पतीच्या रकाण्यात नारण राठवा यांचे नाव आहे. मात्र, संबंधित महिलेने कोर्टात सादर केलेले दस्ताऐवज खोटे असल्याचे राठवा यांनी म्हटले आहे. या दस्ताऐवजच्या विरोधात राठवा यांनी राजकोट येथील कोर्टात खटला दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
नारण राठवा हे आपले पती असल्याचा दावा सौराष्ट्रमधील अमरेली येथील एका महिलेने केला आहे. तसेच राठवा यांच्यापासूनच आपल्याला दोन मुले झाल्याचाही आरोप तिने केला आहे. राठवा हे आपल्यासोबत पतीप्रमाणे राहात होते. परंतु नंतर त्यांनी आपल्याला मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच पीडित महिलेने नारण राठवा यांना पोटगीची मागणी केली आहे. दरम्यान, पतीची बदली करण्‍याच्या कामानिर्मित्त नारण राठवा आणि पीडिता संपर्कात आले होते.
(फाइल फोटो: माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासोबत नारणभाई राठवा)