आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO गुजरात: \'गोरक्षा\'च्या नावाखाली केले असे काम, तरुणांना उघडे करुन चोपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी तरुणांना रस्त्यात पकडून बेदम चोप देण्यात आला. - Divya Marathi
आदिवासी तरुणांना रस्त्यात पकडून बेदम चोप देण्यात आला.
ऊना (गुजरात) - सौराष्ट्रामध्ये मोटा रामढियाला गावात मृत गायींचे कातडे काढून ते विकण्याचा प्रयत्न करणे आदिवासी समाजातील या तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. गो-रक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उघडे करून जाहीरपणे चोप दिला. हातपाय बांधून त्यांची धुलाई केली आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. आदिवासी समाजाच्या नेत्यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकार उघड
- सोमवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्याविरोधात आंदोलन केले.
- या तथाकथित गोरक्षकांचे म्हणणे आहे की आम्हाला माहिती मिळाली होती की काही लोक गाडीमधून बिफ घेऊन जात आहेत.
- या सूचनेवरुन आम्ही गाडी थांबवून त्यातील युवकांना मारहाण केली.
- तथाकथित गोरक्षा समितीच्या या कृत्याचा सोशल मीडियातून निषेध केला जात होत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गो-रक्षक दलाच्या स्वयंघोषित पोलिसांच्या दादागिरीचा VIDEO
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...